Home क्राईम नाभिक समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकणार्‍याविरुद्ध गुन्हा

नाभिक समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकणार्‍याविरुद्ध गुन्हा

0
21
FIR

जळगाव प्रतिनिधी । नाभिक समाजाबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूूर टाकून पोस्ट करणार्‍याच्या विरूध्द रामानंद पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अभय कुलकर्णी (पूर्ण नाव माहीत नाही) याने सोशल मीडियात नाभीक समाजाबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने समाजबांधव आक्रमक झाले आहेत.
माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, जिवा सेनेचे जिल्हाध्यक्ष देविदास फुलपगारे यांच्यासह इतरांनी अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांची भेट घेऊन संबंधित तरुणावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. अशा प्रकारचे वर्तन करणार्‍यांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. या घटनेचा निषेध करीत आंदोलन करण्याचा इशारा नाभिक समाजाने निवेदनातून दिला.

या निवेदनाची दखल भाग्यश्री नवटके यांनी घेऊन संबंधीतांना सूचना केल्या. त्यानुसार अभय कुलकर्णी याच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात अदलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound