जळगाव Jalgaon प्रतिनिधी । अंजुमन तालिमुल मुस्लीमीन संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अलहाज गफ्फार मलिक यांना नुकतीच ग्लोबल पीस विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रदान करण्यात आली असून यानिमित्त मनियार बिरादरीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
जळगाव अंजुमन तालीमुल मुस्लिमीन, मुस्लिम इदगाह कब्रस्तान ट्रस्ट व नॅशनल स्पोर्ट्स क्लब जळगाव चे अध्यक्ष, ईकरा सोसायटीचे जनरल सेक्रेटरी तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी अल्पसंख्यांक समाजाचे माजी अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांना नुकतीच ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटी, चेन्नई तर्फे पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
रविवारी संध्याकाळी त्यांचे जळगावात आगमन झाल्यानंतर जिल्हा मनियार बिरादरीचे (Maniyar Biradari Jalgaon ) प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, उपाध्यक्ष सय्यद चाँद, शहर सचिव सलीम मोहम्मद यांनी त्यांचे शाल व बुके देऊन स्वागत-सत्कार केले यावेळी मुस्लीम इदगाह ट्रस्ट चे सहसचिव अनीस शाह हे सुद्धा उपस्थित होते.
गफ्फार मलिक यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत परराज्य विद्यापीठाने पीएच.डी. देणे हा एक प्रकारे जिल्ह्याचा नव्हे तर महाराष्ट्र राज्याचा गौरव असल्याचे मत मनियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख यांनी व्यक्त केले.
दरम्यान, गफ्फार मलिक यांना मिळालेल्या पीएच.डी. मिळाल्या प्रित्यर्थ जळगाव शहरात त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार सोहळा अंजुमन तालीमुल मुस्लिमीन ही संस्था व मानियार बिरादरी च्या सयुक्त विद्यमाने एका भव्य अशा हॉलमध्ये करण्यात येणार असून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सत्कार सोहळ्यात इतर संस्थांना-संघटनांना सुद्धा सहभागी होता येईल असे आवाहन अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य डॉ बाबू शेख यांनी केले आहे. या कार्यक्रमाची दिनांक ,वेळ व स्थळ लवकरच घोषित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
felicitation of Gaffar Malik Jalgaon