Home Cities जळगाव जळगावात तरूणाचा संशयास्पद मृत्यू; शरिरावर मारहाणीच्या जखमा

जळगावात तरूणाचा संशयास्पद मृत्यू; शरिरावर मारहाणीच्या जखमा

0
40

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मास्टर कॉलनी भागातील रहिवासी असणार्‍या तरूणाचा आज दुपारी संशयास्पद मृत्यू झाला असून त्याच्या शरिरावर जखमा असल्याने कुणी तरी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

याबाबत वृत्त असे की, अस्लीम हनीफ पटेल (वय२३ मास्टर कॉलनी) हा आपल्या आई-वडीलसह राहतो. आज सकाळी दहाच्या सुमारास त्याने जेवण केले. यानंतर तो बाहेर गेला. सुमारे बारा वाजेच्या सुमारास तो घरी पळत आला. तेव्हा घरात त्याचे आई-वडील नव्हते. तर, घरात मावशीच्या मुली होत्या. घरी आल्यानंतर तो पलंगावर पडला. आणि काही क्षणात त्याचा मृत्यू झाला. घाबरलेल्या मावस बहिणींनी शेजारच्यांना हा प्रकार सांगितल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आला. मात्र आधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर्सनी सांगितले.

दरम्यान, अस्लमला कुणी तरी मारहाण केल्याचे दिसून आले आहे. त्याचे डोके, मान आणि छातीला जखमा दिसून आल्या आहेत. मात्र ही मारहाण नक्की कुणी केली याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. त्याचे पार्थिव जिल्हा रूग्णालयात ठेवण्यात आलेले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound