जळगाव प्रतिनिधी । शहरातील गायत्री नगरात बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील कपाटातून सोनेचांदीसह रोकड लंपास केल्याची घटना 19 जुलै रोजी घडली होती. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, संजय नारायण मालपुरे (वय 45) व पत्नी रत्ना संजय मालसुरे (वय-44) रा. प्लॉट नंबर 43, गायत्री नगर) यांचे गायत्री मंदिरासमोर यांचे घर आहे. त्यांचे वडील नारायण राजाराम मालपुरे यांचे पुण्यात निधन झाल्याने अंत्यविधीसाठी मालपुरे आपल्या परिवारासह शुक्रवार 19 जुलै रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पुण्याला गेले. अंतविधी आटोपून रविवार 21 जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरी आल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजा तोडून कपाटातील 50 लाख रुपये रोख, 75 हजार रूपये किंमतीचे तीन तोळे सोन्याची पोत, 30 हजार रूपये किंमतीचे 10 ग्रॅम सोन्याची चैन आणि 15 हजार रूपये किंमतीचे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकुण 1 लाख 70 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी रत्ना संजय मालसुरे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तपासासाठी गुरूजितसिंग सुजाणसिंग बावरी (वय-19) रा. सदगुरू कॉलनी, तांबापूरा आणि मोनूसिंग जगदीशसिंग बावरी (वय-20) रा. शिरसोली नाका, तांबापूरा यांना एमआयडीसी पोलीसांनी 30 रोजीच्या मध्यरात्री जिल्हा कारागृहातून ताब्यात घेतले आहे.
संशयित आरोपी मोनूसिंगने काढून दिला होता मुद्देमाल
गांधी नगरातील डॉ.रामकृष्ण नेहते यांच्या घरात डल्ला मारून ७ लाख ६६ हजार रूपये किंमतीचा ऐवज लांबविणाऱ्या मोनूसिंग जगदीशसिंग बावरी (रा. तांबापुरा) याप्रकरण यापुर्वी शहर पोलीसांनी त्याला अटक केली होती. त्याच्या ताब्यातील 3 लाख रुपयांची 100 ग्रॅम वजनाची सोन्याची चिफ, 30 हजार रुपयांची 5 ग्रॅम वजनाची कानातले सोन्याचे दोन जोड, 18 हजारांची सोन्याचे सहा ग्रॅम वजनाचे मणी मंगळसुत्र, 75 हजाराची पाच ग्रम वजनाच्या पाच अंगठ्या, 36 हजार रुपयांचे 12 ग्रम वजनाचे सोन्याचे पेडल, 5 हजाराचे सोन्याचे दोन तुकडे प्रत्येकी 1 ग्रम वजनाचे, 12 हजार रुपयांची सोन्याच्या प्रत्येकी दोन ग्रम वजनाच्या दोन अंगठ्या, 5 हजाराची सोन्याच्या प्रत्येकी एक ग्रम वजनाच्या दोन वस्तू, 27 हजारांची 9 ग्रम वजनाची सोन्याची पट्टी, 30 हजार रुपये किंमतीची 1 किलो वजनाचे चांदीचे नाणे आणि 20 हजारांचे चादीचे एक ताट तीन ग्लास दोन वाट्या दोन समया, दोन अत्तरदाण्या, तीन चमचे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मोनुसिंग बावरीवर यापुर्वी एमआयडीसी हद्दीत 5, जिल्हा पेठ पोलीसात -2 आणि रामानंद नगरा पोलीसात -1 असे एकुण आठ गुन्हे दाखल आहेत.