जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने जळगाव शहर महानगरपालिकातर्फे मतदान जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
यात फलक लेखनाद्वारे मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच शहरातील प्रमुख चौकात पथनाट्य, शाळा व वार्डात रांगोळी स्पर्धा , चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बचत गटांद्वारे रॅली काढण्यात आली. याप्रसंगी ५९०० महीलांनी मतदानाची टक्का वाढविण्यासाठी शपथ घेतली. मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी रॅली सहभाग घेतला होता.
शहरातील प्रमुख चौकात २५ बॅनर द्वारे जनजागृती करण्यात आली याबरोबरच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सामाजिक कार्यक्रमात, उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात युवारंग कार्यक्रमात जनजागृती व शपथ देण्यात आली. तसेच मतदानाचे संदेश देणारे आकाश कंदील द्वारे सरकारी आस्थापनावर व खाजगी आस्थापनांवर लावून आणि शहरातील कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीवर मतदार यादयांचे क्युआर कोड झिंगल बेल उद्घोषणा देण्यात आल्या आहे. ९४.३ एफ एमला मुलाखाती द्वारे आयुक्तांनी देखील मतदान जनजागृती विषयक आवाहन केले.