Home Cities जळगाव जळगाव महापालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण जाहीर : ‘या’ प्रवर्गाला मिळणार संधी !

जळगाव महापालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण जाहीर : ‘या’ प्रवर्गाला मिळणार संधी !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगावचे महापौरपद हे ओबीसी महिला साठी राखीव असल्याचे आरक्षण आज मुंबईत निघाले असून आता या पदावर नेमके कोण विराजमान होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीला भरभरून यश मिळाले होते. यात भारतीय जनता पक्षाला ४६ जागा तर शिवसेनेला २२ जागा मिळाल्या होत्या. पाच जागांवर शिवसेना-उबाठा पक्षाने विजय संपादन केला होता. तसेच एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारली होती. यानंतर या अपक्ष उमेदवाराने शिवसेना शिंदे गटाला पाठींबा दिला होता. तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. अशा प्रकारे महापालिकेत महायुतीचे ७० तर विरोधकांचे पाच सदस्य निवडून आले आहेत. कालच महायुतीची नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गटनोंदणी करण्यात आली. यात भाजपच्या गटनेतेपदी प्रकाश बालाणी तर शिवसेनेच्या गटनेतेपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर सर्वांना उत्सुकता लागली होती ती महापौरपदाच्या आरक्षणाची !

या पार्श्वभूमिवर, आज मुंबईत मंत्रालयामध्ये नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत राज्यातील २९ महापालिकेतल्या महापौरपदांचे आरक्षण काढण्यात आले. चक्राकार पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. यात जळगाव महापालिकेसाठी ओबीसी महिला हे आरक्षण निघाले आहे. यामुळे आता याच प्रवर्गातील महिला महापौरपदी विराजमान होणार असल्याचे अधोरेखीत झाले आहे. तर आता या पदासाठी भारतीय जनता पक्षातील अंतर्गत घडामोडी गतीमान होणार असल्याचेही दिसून आले आहे.


Protected Content

Play sound