जळगाव प्रतिनिधी । आजच्या माणूसकीशून्य जगात व त्यातही कोविडच्या संसर्गामुळे कुणी पेशंटला मदत करण्यासाठी धजावत नाही. या पार्श्वभूमिवर, शहरातील नगरसेविका मीनाक्षी गोकुळ पाटील यांनी गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर विव्हळत पडणार्या रूग्णाला हॉस्पीटलमध्ये पोहचवले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत वृत्त असे की, १२ ते १५ दिवसांपासून एमआयडीसी च्या स्टील फॅक्टरीसमोरील महादेव मंदिरालगत एक अज्ञात व्यक्ती खितपत पडलेल्या अवस्थेत होता. याबाबतची माहिती अयोध्यानगरातील नगरसेविका मीनाक्षी गोकुळ पाटील यांना काल रात्री मिळाली. या अनुषंगाने त्या आज प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्या.
या ठिकाणी एक वृध्द व्यक्ती वेदनेने तडफडत असल्याचे त्यांना दिसून आले. त्या व्यक्तीचे नाव बुधा नारायण कोळी ( मध्य प्रदेश बॉर्डर वरील एका खेड्यातील ) सदर व्यक्ती असल्याचे त्याने सांगितले. जळगाव एमआयडीसी व्ही सेक्टर महादेव मंदिरासमोर १५ दिवसांपासून तळमळत होता , पण त्याच्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नव्हते.त्याच्या कंबरेला मोठा मार ही लागलेला होता.
दरम्यान, या व्यक्तीची गंभीर अवस्था लक्षात घेऊन नगरसेविका मिनाक्षी पाटील यांना त्या परिसरातून फोन आला तर त्यांनी लगेच तातडीने एमआयडीसी पोलीस व १०८ नंबरवर रुग्णवाहिका बोलवून सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलवले. पण तेथे सुविधा उपलब्ध नसल्यामुळे लगेचच गोदावरी हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्तीस उपचारासाठी करण्यात आले. त्या व्यक्तीस कोणी स्पर्शही करत नव्हते , मीनाक्षी पाटील यांनी स्वतः हातमोजे घातले आणि भीती न बाळगता रुग्णवाहिकेमध्ये घेतले, रुग्णवाहिकेचे व्यक्ती सुद्धा त्या व्यक्तीला मदत करायला पुढे यायला तयार नव्हते , उचलू लागत नव्हते ,याचे आश्चर्य वाटले , असे त्यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या प्रतिनिधीस बोलताना सांगितले.
या संदर्भात त्या म्हणाल्या की, रस्त्याच्या कडेला एक माणूस विव्हळत असतांना फक्त बघ्यांची गर्दी होत होती. मात्र भीतीने पुढे कोणी येत नसल्याचा त्यांना प्रत्यय आलाय.खरोखरच आज जगात भावनाशून्य लोक आहेत की काय? असेच त्यांना वाटले.
कोरोना महामारी चालू असताना या नगरसेविकेंकडून असे कार्य खरच कौतुकास्पद आहे या कार्याबद्दल त्यांचे अयोध्यानगर आणि परिसरातील नागरिकांनी कार्याचे कौतुक केले आहे. असाच आदर्श इतरानींनीही घेण्याची गरज आहे असा सूर निघत होता.
मीनाक्षी गोकुळ पाटील यांनी याबाबत दिलेल्या माहितीचा व्हिडीओ खाली दिलेला आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/639702270008648/?eid=ARC-HzUDsEq9oiPwsNQ7TmnyjT6ovY41Qvur7BsHuhyLnotkhefhmVYA1gvuQ4T_a0k2C9xDeEMrSCnl