जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एमआयडीसीतील रवी इंडस्ट्रीज या केमिकल कंपनीला आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत सुदैवाने कुणाचीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाहीय. परंतू आग इतकी भयंकर आहे की, कंपनीत मोठ-मोठे स्फोट होत असल्यामुळे प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील एमआयडीसीतील दैनिक लोकमतच्या मागे असलेल्या रवी इंडस्ट्रीज या केमिकल या कंपनीला आज सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले असून मोठ-मोठे स्फोट सुरु आहेत. आग नेमकी कशी लागली याचा खुलासा होऊ शकला नाही. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा अग्नीशामक दलाचे कर्मचारी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. तर आगीच्या धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत आहेत.