Home Cities जळगाव होय… मंगेश चव्हाणच बनणार दुध संघाचे चेअरमन ! : नावावर शिक्कामोर्तब

होय… मंगेश चव्हाणच बनणार दुध संघाचे चेअरमन ! : नावावर शिक्कामोर्तब

0
51

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या भाकितावर शिक्कामोर्तब झाले असून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हेच जिल्हा दुध संघाचे चेअरमन बनणार आहेत.

नुकत्याच पार पाडलेल्या जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला होता. यात प्रामुख्याने चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची महत्वाची भूमिका राहिली होती. यामुळे ते चेअरमनपदी विराजमान होतील असे मानले जात होते. आणि नेमके तेच घडले.

जिल्हा दुध संघाच्या नवनिर्वाचीत संचालकांची रात्री उशीरापर्यंत बैठक सुरू होती. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांची देखील याला उपस्थिती होती. यात सर्वानुमते चेअरमनपदी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे आता जिल्हा दुध संघाची धुरा ही त्यांच्याकडे येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सकाळी या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल.


Protected Content

Play sound