जळगाव (प्रतिनिधी) शहरातील खेडी पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी एका बांधकाम ठेकेदार विपिन मोरे यांचा खून झाला आहे. धक्कादायक म्हणजे खून करणाऱ्या आरोपींनी मयत विपिन यांना दोन दिवसापूर्वीच ‘ये तो ट्रेलर हैं…पिच्चर अभी बाकी…हैं’ अशी धमकी दिली होती. तर या प्रकरणाची पोलिसांनी वेळीच योग्य दखल न घेतल्यामुळे आज खून झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, खेडी परिसरातील पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी ९ ते ९:३० वाजेच्या सुमारास विपिन दिनकर मोरे (वय ३५ रा. खेडी) हे आपल्या दुचाकीवरून जात होते. याचवेळी तिघांनी येत त्यांच्यावर चाकूने हल्ला चढविला. हा खून अमोल सोनवणे, शंकर सोनवणे आणि अरुण सोनवणे या तिघांनी केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या हल्ल्यात विपिन हा जागीच ठार झाला होता.दरम्यान, विपिन आणि मारेकऱ्यांमध्ये अनेक दिवसापासून वाद होता. अनेकवेळा पोलिसात तक्रारी देखील झाल्या होत्या. परंतू आज थेट या वादातून विपिनचा खूनच झाला.
विपिन मोरे यांनी तिघं आरोपींविरोधात एमआयडीसी पोलिसात एका वादातून तक्रार दिली होती. त्यामुळे दोन दिवसापूर्वी विपिन मोरे यांना अमोल सोनवणे, शंकर सोनवणे आणि अरुण सोनवणे या तिघांनी ये तो ट्रेलर हैं…पिच्चर अभी बाकी हैं..अशी धमकी दिली होती. त्यानुसार आज सकाळी खेडी पेट्रोल पंपावर तिघांनी विपिनला गाठत जबर मारहाण केली आणि त्यानंतर चाकू भोसकून खून केला. दरम्यान, पोलिसांनी वेळीस आरोपींविरुद्ध कारवाई केली असती. तर आज खून झाला नसता. असा संताप मयतचे विपिनचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात करत होते.