Home क्राईम पत्रकार सुर्यभान पाटील यांचे निधन

पत्रकार सुर्यभान पाटील यांचे निधन


जळगाव प्रतिनिधी । इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे पत्रकार सुर्यभान पाटील यांचे आज कोरोनामुळे उपचारादरम्यान दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास  निधन झाले. लाईव्ह ट्रेन्डस् न्यूज परिवारातर्फे त्यांना आंदरांजली.

गेल्या १० ते १५ दिवसांपासून कोराना बाधित असलेले पत्रकार तथा कॅमेरामॅन सुर्यभान पाटील शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. शहरातील महत्वाच्या घडमोडीसाठी नेहमी तत्पर, सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तीमत्व, इतरांसाठी नेहमी मदतीसाठी धावणारा पत्रकार आज काळाने हिरावून घेतला आहे. शहरातील खासगी रूग्णालयात आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. लाईव्ह ट्रेन्डस् न्यूज परिवारातर्फे त्यांनी आदरांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो !!!


Protected Content

Play sound