Home Cities जळगाव जळगाव जनता बँकेच्या उपाध्यक्षपदी डॉ. अतुल सरोदे

जळगाव जनता बँकेच्या उपाध्यक्षपदी डॉ. अतुल सरोदे


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खान्देशातील अग्रगण्य शेड्यूल्ड बँकेच्या उपाध्यक्षपदी बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉ श्री अतुल गुणवंतराव सरोदे यांची बिनविरोध निवड आज ६ सप्टेंबर रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयात दुपारी १२ वा. अध्यासी अधिकारी मा श्री विशाल ठाकुर, सहाय्यक निबंधक, अधीन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.

याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष श्री सतीश मदाने व मा संचालक मंडळ यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉ. अतुल गुणवंतराव सरोदे यांचा सत्कार केला. यावेळी बँकेचे संचालक सीए अनिल राव, केशवस्मृती सेवा समूहाचे प्रमुख भरतदादा अमळकर, माजी अध्यक्ष संजयजी बिर्ला, बँकेच्या संचालिका आरती हुजूरबाजार, बँकेचे संचालक हरिश्चंद्र यादव, जयंतीलाल सुराणा, विवेक पाटील, सीए नितीन झंवर, संजय प्रभुदेसाई, हिरालाल सोनवणे, सपन झुनझुनवाला, डॉ. पराग देवरे, मधुकर पाटील, सीए सुभाष लोहार, संचालिका संध्या देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती आदी मान्यवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound