जामनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जनता बँक ही संघाचा विचारावर चालणारी असून त्यामुळे ग्राहकाचे हित जोपासून विविध सामाजिक क्षेत्रात बँक ही अतिशय चांगले काम करीत आहे. बँकेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला सेवा देण्याचे काम केला जात असल्याची माहिती जळगाव जनता बँक संचालक अतुल गुणवंतराव सरोदे यांनी दिली.
जामनेर येथे केशव स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालवले जाणारे जामनेर येथील जळगाव जनता बँक सभासद मेळावा बाबाजी राघव मंगल कार्यालय पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमलळकर होते. यावेळी व्यासपीठावर संचालक अतुल सरोदे, आरती मुजुमदार, जयंतीलाल सुराणा, हरिश्चंद्र यादव, दीपक अल्ट्रावलकर, विवेक पाटील, नितीन जवळ, संजय कुलकर्णी, चंद्रकांत बाविस्कर, गोविंद अग्रवाल, डॉ. प्रशांत भोंडे आदी उपस्थित होते.
जामनेर येथे जळगाव जनता बँक सहकारी संस्थेच्या ग्राहक सभासद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी माहिती देताना संचालक अतुल गुणवंतराव सरोदे यांनी सांगितले की, २० जानेवारी १९७९ ला स्थापन झालेल्या जळगाव जनता सहकारी बँकेच्या माध्यमातून अतिशय चांगले काम केले जात असून नऊ जिल्ह्यात चाळीस शाखा कार्यरत आहे. ५७ हजार पेक्षा जास्त ग्राहक या बँकेच्या माध्यमातून जोडली असून बँक ही मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम राबवत आहे. अध्यक्षीय भाषणात केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अंमलळकर यांनी ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी बँक काम करीत आहे. त्यामुळे विविध माध्यमातून फायदा देण्यासाठी बँक ही पर्यत्न करीत असल्याची माहिती यावेळी बोलताना दिली. सूत्रसंचालन आर. यस. पाटील तर आभार एम. एस. पंडित सर यांनी मानले. ग्राहक सभासद मेळाव्याला मोठ्या संख्येने ग्राहक व कर्मचारी उपस्थित होते.