जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणार्या हनी ट्रॅप प्रकरणात अखेर राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी काल सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप केले होते. त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा कट मनोज वाणी यांनी रचला असून यात काही महिलांना सहभागी करून घेण्यात आले होती. ही महिला अभिषेक पाटील यांना भेटल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. तर, या महिलेने अभिषेक पाटील यांना मनोज वाणी यांनी त्यांचा क्रमांक व छायाचित्रे पाठविल्याचे दाखविले होते. मात्र या प्रकरणी चौकशी सुरू करताच या महिलेने आपला फोन हरविल्याचे सांगितल्याने या प्रकरणाचा संशयकल्लोळ वाढला होता.
दरम्यान, या प्रकरणी आज अभिषेक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलीस स्थानकात मनोज वाणी यांच्यासह दोन महिलांच्या विरूध्द कलम ४१७, १२० (ब) व २९४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.