जळगाव प्रतिनिधी । जामनेर – जळगाव या वर्दळीच्या राज्य महामार्गावर एमआयडीसी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास बजाज कंपनीच्या सर्व्हिस सेंटरलगत घडली. चोरट्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे.
शहरातील जळगाव-जामनेर रस्त्यावरील बजाज सर्विस सेंटरच्या कुंपनालगत बोळीत एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे. या एटीएम लुटण्यासाठी चारचाकीने पाच ते सहा चोरटे आले. कटरसह साहित्य घेवून एटीएम फोडण्यासाठी चोरट्याने प्रवेश केला. मोठ्या कटरने चोरट्यांनी एटीएमचे केबल तोडून त्यातील रक्कम लांबविण्याचा प्रयत्न केला. गस्तीवर असलेले पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील यांच्यासह कर्मचार्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांची चाहूल लागताच चारचाकीतून आलेले चोरटे पसार झाले.
चोरटे 10 मिनिटे एटीएममध्ये होते. हा सर्व प्रकार एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये कैद झाला आहे. फुटेजनुसार 1.20 मिनिटांनी पांढर्या चारचाकी एटीएमजवळ थांबली. रेनकोट घातलेला व्यक्तीने प्रवेश केला. यानंतर तो पुन्हा बाहेर पडला. यानंतर पुन्हा दुसर्या एक जण तोंडाला रुमाल बांधलेला एक जण, 1.31 वाजेच्या सुमारास कटरने कुठलीतरी केबल तोडतांना चोरटा दिसत आहे. यानंतर दोन जण एटीएम बाहेर उभे व यानंतर जातांना दिसत आहे. हा सर्व प्रकार बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.