जळगाव प्रतिनिधी | महापालिका क्षेत्रात क्षेत्रसभा घेण्याच्या नियमाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे.
महापालिकेच्या अंतर्गत क्षेत्रसभा घेण्यात याव्यात या मागणीसाठी दीपक कुमार गुप्ता हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी या संदर्भात राज्यपालांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्यक्ष भेऊ घेऊन निवेदन दिले आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की, क्षेत्रसभेसंदर्भात महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. कलम २९ मधील कार्यादेशाच्या पोटकलम १ नुसार नगरसेवकांनी दोन वर्षांच्या काळात चार क्षेत्रसभा घेणे आवश्यक आहे. यात कसूर झाल्यास राज्य सरकारच्या राजपत्रातील आदेशाद्वारे पालिका सदस्यत्व अपात्र ठरवण्यात येईल, अशी तरतूद आहे. क्षेत्रसभेसंदर्भात राज्य शासनाचे राजपत्र प्रसिद्ध झाले आहे; परंतु शासनातील अधिकार्यांनी मात्र अद्यापही अंमलबजावणी केलेली नाही. ३ जुलै २००९ रोजी क्षेत्रसभा घेण्यासंदर्भात कायद्यात सुधारणा होऊनही ११ वर्षे उलटले तरी निर्णय घेतला जात नाही. यामुळे विलंब करणार्या अधिकार्यांवर कारवाईची मागणी गुप्ता यांनी केली आहे.
यात पुढे म्हटले आहे की, राजपत्रातील आदेशाद्वारे पालिका सदस्यत्व अपात्र ठरवण्यात येईल, अशी तरतूद आहे. क्षेत्रसभेसंदर्भात राज्य शासनाचे राजपत्र प्रसिद्ध झाले आहे; परंतु शासनातील अधिकार्यांनी मात्र अद्यापही अंमलबजावणी केलेली नाही. ३ जुलै २००९ रोजी क्षेत्रसभा घेण्यासंदर्भात कायद्यात सुधारणा होऊनही ११ वर्षे उलटले तरी निर्णय घेतला जात नाही कायद्यात केलेल्या तरतुदीनुसार महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९च्या कलमानुसार नगरसेवकांनी दोन वर्षांच्या काळात चार क्षेत्रसभा घेणे आवश्यक आहे. यात कसूर झाल्यास राज्य सरकारच्या राजपत्रातील आदेशाद्वारे आयुक्तांनी दिलेल्या निर्देशावरून पालिका सदस्यत्व अपात्र ठरवण्यात येईल, अशी तरतूद आहे; परंतु तरतुदींची अंमलबजावणी झाालेली नाही. यामुळे या संदर्भात अंमलबजावणीचे निर्देश देण्यात यावेत अशी मागणी देखील दीपक कुमार गुप्ता यांनी केली आहे.