जळगाव प्रतिनिधी । खासदार रक्षाताई खडसे यांच्याबाबत भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह विवरण असल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. यावर बोलतांना रक्षाताई खडसे यांनी हा सर्व प्रकार कुणाचा तरी खोडसाळपणा असल्याचा आरोप केला. एखाद्या महिलेबाबत असे काही होणे हे चुकीचे असून चौकशीत ही बाब समोर येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनीही या प्रकाराचा निषेध करून दोषींवर कारवाईची मागणी केली.
याबाबत वृत्त असे की, भाजपच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्याबाबत भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख असल्याचे ट्विट पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण तापले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, जळगावात आयोजित बैठकीसाठी खासदार रक्षा खडसे आल्या आहेत. याआधी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी या प्रकारात भाजपची कोणतीही चूक नसल्याचे सांगितले. हा सर्व प्रकार कुणी तरी खोडसाळपणाने केला असून चौकशीत याबाबत खरे काय ते समोर येईल असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनीही या प्रकाराचा निषेध केला. ते म्हणाले की, एखाद्या महिलेबाबत अशा प्रकारचे केलेले कृत्य हे चुकीचे असून याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
खालील व्हिडीओत पहा ना. गुलाबराव पाटील व खासदार रक्षा खडसे नेमके काय म्हणालेत ते….
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/785983132125123