जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. लॉकडाऊनमुळे शासकीय नियमांचे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
लॉकडाऊनमुळे सार्वजनीक ध्वजारोहण कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. तसेच मुख्य शासकीय ध्वजारोहण देखील शासकीय नियमांचे पालन करून करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जळगाव शहर महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उप वनसंरक्षक वि. वि. होशिंग, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यंवशी, उपविभागीय अधिकारी दिपमाला चौरे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, राजेंद्र वाघ, प्रसाद मते, किरण सावंत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, नायब तहसीलदार रवी मोरे यांचेसह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरीक, कोरोनायोध्दे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक, माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2400396076928096