जळगाव प्रतिनिधी । येथील आनंद निसर्गोपचार केंद्रांतर्फे तीन दिवसीय गर्भसंस्कार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
बाळाला ते गर्भात असतांनाच त्याच्यावर सकारात्मक बाबींचे संस्कार करण्याचे शास्त्र म्हणजेच गर्भसंस्कार असून याची उपयुक्तता विज्ञानानेही सिध्द केलेली आहे. या पार्श्वभूमिवर, गिरणा नदीच्या काठावर असलेल्या आनंद निसर्गोपचार केंद्रातर्फे तीन दिवसीय गर्भसंस्कार शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. यात बाळाशी संवाद कसा साधावा ? गर्भावस्थेत घ्यावयाची काळजी, गर्भावस्थेत मनाला आनंद देणारे छंद कसे जोपासावेत ? गर्भवतीचा संतुलीत आहार कसा असावा ? आदींबाबत आनंद निसर्गोपचार केंद्राच्या संचालिका चेतना विसपुते या सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
ही कार्यशाळा ३ ते ५ जुलैच्या दरम्यान दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत होणार आहे. इच्छुक गर्भवती महिलांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी ९४२२७७६२३३ आणि ७९७२१२८३३४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.