जळगाव, जितेंद्र कोतवाल | शहरात गेल्या वर्षी झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी मयताच्या भावांनी प्रमुख आरोपीला संपविण्याची सुपारी दिली खरी….मात्र ही सुपारी न फुटता फसली… यामुळे उलटपक्षी मारायला आलेल्यांनाच धुम ठोकावी लागली. या सर्व गोंधळात हल्लेखोरांवरही प्रतिहल्ला चढविल्याची नाट्यमय घटना घडली. याला जळगावातील दोन टोळ्यांच्या संघर्षाचा आयाम देखील आहेच. यामुळे जळगावच्या गुन्हेगारी विश्वातील ही सुपारी अनेक प्रश्नांना जन्म देणारी असून यात आगामी घटनांचे बिजारोपण होऊ शकते असे दिसून येत आहे. आज सकाळपासून सायंकाळपर्यंत नेमके काय घडले ते आम्ही आपल्याला क्रमानुसार समजून सांगत आहोत.
आज सकाळी आठच्या सुमारास www.livetrends.news कांचननगरातील रहिवासी आकाश मुरलीधर सपकाळे याच्या थेट घरात घुसून हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली. प्रथमदर्शीनी हा हल्ला सूडचक्रातून करण्यात आल्याची माहिती मिळाली. आज सायंकाळी या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगावात घडलेली आधीची घटना आणि दाखल झालेल्या एफआयआरच्या माध्यमातून आजच्या हल्ल्यातील तपशील समोर आला आहे.
पहिल्यांदा समजून घ्या : हल्ला का झाला ?
माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश सपकाळे याचा ४ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास शिवाजी नगर स्मशानभूमीरोडवर तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आला होता. www.livetrends.news या खूनप्रकरणी आकाश मुरलीधर सपकाळे (रा. कांचन नगर); गणेश दंगल सोनवणे (रा. वाल्मिक नगर), विशाल संजय सपकाळे (रा.राजाराम नगर), रुपेश संजय सपकाळे (रा.कांचन नगर) आणि महेश राजू निंबाळकर यांना अटक करण्यात आली होती. यातील संशयितांना नंतर जामीन मिळाला होता. यातील आकाश सपकाळे हा लाडू गँगचा म्होरक्या असून त्याच्यावर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
आपल्या भावाचा खून करणार्यांना धडा शिकवावा म्हणून मयत राकेशचे भाऊ बाबू सपकाळे आणि बंटी सपकाळे यांनी मिलिंद सकट (वय-२६); प्रदुम्न उर्फ बंटी नंदू महाले (वय-२५) रा. हुडको शिवाजी नगर, राहूल उर्फ सुपड्या भालेराव रा. हुडको पिंप्राळा, मयूर उर्फ विक्की दिपक अलोणे (वय-२७) रा शिवाजीनगर या तिघांना लाडू गँगचा म्होरक्या आकाश सपकाळे याला संपविण्याची सुपारी दिली होती.
असा झाला हल्ला…!
आज सकाळी साडेसातच्या सुमारास मिलिंद सकट; प्रदुम्न उर्फ बंटी नंदू महाल; राहूल उर्फ सुपड्या भालेराव आणि मयूर उर्फ विक्की दिपक अलोणे हे रिक्षाने कांचननगरमध्ये गेले. www.livetrends.news सकाळी ८ वाजता आकाश सपकाळे हा कांचन नगरात राहत्या घरात पलंगावर झोपलेला होता. याप्रसंगी विक्की अलोणे आणि मिलींद सकट हे आकाशच्या खोलीत घुसले. विक्की आणि मिलींद यांनी गावठी पिस्तूल काढून आकाशवर बेधुंद फायरिंग केली. आकाशच्या उजव्या हाताच्या करंगळीला लागल्याने जखमी झाला. गोळीबार होत असल्याचा आवाज आल्याने आकाशचा भाऊ नितीन सपकाळे आणि वडील मुरलीधर गयभू सपकाळे धावत आले. नितीन सपकाळे याच्यासोबत विक्की आणि मिलींद यांची झटापटी झाली. यात मिलींद घटनास्थळाहून निसटला. तर विक्की खोलीच्या बाहेर येत असतांना पायर्यांवरून पाय घसरला आणि लोखंडी खांब लगल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो बेशुध्द पडला. यात विक्कीला सोडून मिलींद सकट, प्रद्युम्न महाले, सुपड्या उर्फ राहूल भालेराव हे तिघांनी पळ काढला. तर गोळीबाराच्या आवाजाने परिसरात नागरिक घटनास्थळी धावत आले. यातच आकाश सपकाळे याने त्याच्या बुलेटवरून रिक्षाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही अंतरावर बुलेट बंद पडल्याने तो घरी परत आला. यामुळे हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले.
आकाश सपकाळेने दिलेल्या फिर्यादीत राजू उर्फ बाबू अशोक सपकाळे आणि सोनू सपकाळे हे शिवाजीनगर ग्रुप या नावाने टोळी चालवून परिसरात दहशत पसरवत असून त्यांनीच आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याचे नमूद केले आहे. यामुळे त्याने मिलिंद सकट; प्रदुम्न उर्फ बंटी नंदू महाल; राहूल उर्फ सुपड्या भालेराव आणि मयूर उर्फ विक्की दिपक अलोणे, बाबू सपकाळे आणि सोनू सपकाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद दिली आहे.
याच वेळेस झाला प्रतिहल्ला
आकाश सोनवणे याच्या घरातून पळतांना विक्की अलोने याच्या डोक्याला खांब लागल्याने तो बेशुध्द पडल्याचे आकाशने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तर विक्कीने सायंकाळी विरोधात फिर्याद दिली. www.livetrends.news याच्यानुसार त्याने आपल्याला राजू उर्फ बाबू अशोक सपकाळे याने भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आकाश सपकाळेचा मर्डर करण्यासाठी सुपारी दिल्याची कबुली दिली आहे. यानुसार आम्ही तिन्ही जण सकाळी आकाश सपकाळेच्या घरात शिरलो. तेव्हा बंटी महाले याने आकाशवर तीन फायर केला. मात्र यात तो बचावला. यातच आकाशचे वडील आणि भाऊ आल्यानंतर आम्ही बाहेर पळालो. बाहेर पडल्यानंतर माझा पाय गटारीत पडल्याने मी तेथे पडलो. यानंतर आकाश मुरलीधर सपकाळे, नितीन उर्फ सागर मुरलीधर सपकाळे आणि त्यांचे वडील मुरलीधर गयभू सपकाळे या तिघांनी लाकडी दांड्यासह चाकूने आपल्यावर हल्ला केला. तर रूपेश संजय सपकाळे याने दगडाने आपल्याला मारहाण केल्याचे त्याने नमूद केले आहे. यामुळे या चौघांच्या विरूध्द त्याने फिर्याद दाखल केली आहे.
होय हे टोळीयुध्दच…!
आज सकाळी गोळीबार घडल्यानंतर लाईव्ह ट्रेंडस न्यूजने हा प्रकार टोळीयुध्दाची नांदी असल्याचे म्हटले होते. पोलीसात दाखल फिर्यादींमधून हे स्पष्टपणे अधोरेखीत झाले आहे. यात लाडू गँग विरूध्द शिवाजीनगर ग्रुप या दोन टोळ्यांमधील संघर्ष आता चिघळल्याचे दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे हल्लेखोर आणि ज्यांच्यावर हल्ला झाले ते दोन्ही बाजूंनी सुपारी दिल्याचे फिर्यादीतून कबूल केले आहे.
पोलीसांची तत्परता
आज सकाळीच घडलेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, पोलीस उपनिरीक्षक अमोल कवडे, पोउनि सुरेश सपकाळे, पोहेकॉ परिष जाधव, पो.ना. किरण वानखेडे, अनिल कांबळे, राहूल पाटील, राहूल घेटे आदी अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने फरार झालेले तीन संशयित आरोपी काही तासात ताब्यात घेतले आहे. याचमुळे एका दिवसात या हल्ल्यातील सर्व तपशील जगासमोर आले असून ते लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सादर करण्यात आले आहेत.