जळगाव (विजय पाटील)। शहरात उत्साहात साजरा होत असलेला गणेशोत्सव आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. ठिकठिकाणी मोठमोठ्या मंडळांनी तयार केलेल्या देखाव्यांना गणेशभक्तांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत असून पाऊस असतांनाही सायंकाळी लोक हे देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी करीत आहेत. यामध्ये चार धाम दर्शन, अंदमानच्या सेल्यूलर जेलचा देखावा, माऊंट अबू या पर्यटनस्थळाचा देखावा यांना विशेष प्रतिसाद लाभत आहे. आज गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने रस्त्यावर भक्तांच्या झुंडी दिसत आहेत.
जळगावात गणेशभक्तांचा भव्यदिव्य देखाव्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद (व्हिडीओ)
5 years ago
No Comments