जळगाव प्रतिनिधी | शहरातील तुळजामाता नगरातील भाजी विक्रेत्या महिलेचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुरेश महाजन याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील तुळजामाता नगरातील भाजी विक्रेत्या विधवा महिलेचा खून सुरेश सुकलाल महाजन याने केला. त्याला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मृत महिला व सुरेश महाजन यांच्यात अनैतिक संबंध होते. मात्र, या महिलेने दुसर्या व्यक्तीशी संबंध प्रस्थापित केल्याच्या रागातून गुरुवारी रात्री महाजन याने तिच्या डोक्यात एक किलो वजनाचे माप मारून सुरीने पवार केले. त्यानंतर गळफास दिला. त्यात या महिलेचा मृत्यू झाला. महाजन याला अटक केल्यानंतर न्यायाधीश ए. ए. शेख यांच्या न्यायालयात हजर केले होते. याप्रसंगी त्यांनी महाजन याला चार दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केली.