जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नंदगाव येथे शेत रस्त्याच्या वादातून धमकावून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तब्बल १३३ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील नंदगाव येथे शेताकडे जाण्याचा रस्ता खोदल्याने तरुणाला शिवीगाळ करून त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गेल्या महिन्यात १३ जून रोजी घडली होती. यात प्रदीप दिलीप सोनवणे यांना ट्रॅक्टरवरून धिंड काढण्याची धमकी देत त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. तसेच त्यांना मारण्याचीही धमकी देण्यात आली होती.
या प्रकरणी प्रदीप दिलीप सोनवणे यांनी २३ जुलै रोजी तालुका पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार तालुका पोलिसात १३३ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रभान कौतीक सोनवणे, सतीश बाबुराव धनगर, कल्पना चंद्रभान सोनवणे, सुरेखा प्रविण धनगर यांच्यासह गावातील १३३ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.