जळगाव प्रतिनिधी | नारायण राणे यांच्या अटकेनंतर जमावबंदीचे उल्लंघन करून आंदोलन करतांना भाजप कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकार्यांवर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल संपूर्ण दिवस जळगाव जिल्ह्यात हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा पहायला मिळाला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्ह्यात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. आंदोलनाच्या दरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजप कार्यालयात शिरले. त्यांनी तेथे कोंबड्या फेकून उपस्थितांना धक्काबुक्की केली. या प्रकाराचा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी निषेध करून गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता.
यानंतर रात्री शहर पोलीस स्थानकात शिवसेनेच्या २५ पदाधिकार्यांवर जमावबंदीचे उल्लंघन आणि धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात महापौर आणि उपमहापौरांसह अन्य पदाधिकार्यांचा समावेश आहे.