जळगाव प्रतिनिधी । पिण्याचे पाणी भरण्यासाठी विदयूत मोटारीला नळी लावतांना ईलेक्ट्रिकचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, बिमलेश श्याम कुमार (वय-28) रा. उनमात ता. इटारसी जि. लालस ह.मु. सम्राट कॉलनी, लक्ष्मी कॉलनी जवळ हा पाणी पुरीच्या दुकानावर गेल्या आठ ते दहा वर्षांपासून कामाला आहे. त्याच्यासोबत काही मित्रदेखील चव्हाण नामक ठेकेदाराकडे कामाला आहे. आज सकाळी 4 वाजता पिण्याचे पाणी भरण्यासाठी विद्यूत पंप सुरू केला. यावेळी मोटार सुरू केल्यानंतर 10 मिनीटात पाण्याची नळी निघाली. चालू मोटारमध्ये ती पुन्हा जोडण्यासाठी हात लावला असता त्यांना विजेचा जोराचा धक्का बसला. त्यात ते जागीच ठार झाले. त्यांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास स.फौ.मगन मराठे करीत आहे.