Jalgaon जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेला वरूणराजा येत्या काही दिवसांमध्ये परतणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
यंदा मध्यंतरी चांगला पाऊस झाला असला तरी आता पावसाने दडी मारली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमिवर हवामान खात्याने आता दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. येत्या चार-पाच दिवसांमध्ये जिल्ह्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे.
जळगाव जिल्ह्यात सध्या सरासरीच्या सुमारे ६५ टक्के इतका पाऊस झालेला आहे. यामुळे पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात दिलासादायक पाऊस झाला तर याचा खरीपासह आगामी रब्बी पिकांनाही लाभ होण्याची शक्यता आहे. अर्थात, जलसाठ्यांनाही याचा लाभ होणार आहे. सध्या पाऊस नसल्याने हतनूर, गिरणा आदी धरणांमधून नदीपात्रातला पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे.