जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री अमित शहा यांचा नियोजित असलेला गुरुवार 15 फेब्रुवारी रोजी जळगाव येथील युवा संवाद दौरा काही कारणास्तव रद्द झाल्याचे माहिती समोर आले आहे. त्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा गुरुवारी १५ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरातील सागर पार्क येथे युवा सभेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची संवाद साधणार होते. या अनुषंगाने गिरीश महाजन यांनी सभेच्या नियोजन संदर्भात भाजप कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. तसेच कालच त्यांनी सागर पार्क येथे जाऊन सभेच्या जागेची पाहणी केली होती. दरम्यान त्यांचा असलेला युवा संवाद दौरा काही कारणास्तव रद्द करण्यात आल्याचे समोर आले आहे. पुढील दौरा हा लवकरच कळविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.