Home Cities अमळनेर कोण बनणार नगराध्यक्ष ? : एकाच लिंकवर पहा जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे...

कोण बनणार नगराध्यक्ष ? : एकाच लिंकवर पहा जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे लाईव्ह निकाल आणि अपडेटस !

0
869

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यात न्यायालयाच्या निकालामुळे बाकी असलेल्या प्रभागांची निवडणूक काल दिनांक २० रोजी पार पडली. आज रविवार दिनांक २१ डिसेंबर रोजी याचा निकाल जाहीर होत असून आम्ही आपल्याला याचे लाईव्ह अपडेटस देणार आहोत.

लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे जिल्हाभरातील सर्व तालुका प्रतिनिधी आपल्याला प्रत्येक नगरपालिकेतील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या निवडणुकीचे निकाल हे अगदी ‘रिअल टाईम लाईव्ह अपडेट’च्या स्वरूपात देणार आहेत. आपण जी बातमी वाचत आहात याच लिंकवर आपण प्रत्येक शहरातील निकालाचे ताजे अपडेट, आमचे लाईव्ह प्रक्षेपण, विशेष न्यूज बुलेटीन्स आपल्याला पहायला मिळतील.

यात आपल्याला भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, पारोळा, एरंडोल, पाचोरा, भडगाव, शेंदुर्णी, यावल, सावदा, फैजपूर, रावेर, धरणगाव व वरणगाव या नगरपालिका तर मुक्ताईनगर आणि नशिराबाद या नगरपंचायतींचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदांचे निकाल पहायला मिळतील. तर, जामनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपद बिनविरोध झाले असून त्ोथील नगरसेवकपदांचे निकाल पाहता येतील. आपण खालील बाजूला हे निकाल पाहू शकतात.

दुपारी 15.25 : भुसावळात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या गायत्री भंगाळे यांना निर्णयक आघाडी

दुपारी 13.27 :
चोपडा शिवसेनेच्या नम्रता पाटील यांची विजयी आघाडी

दुपारी 13.00 : पारोळा नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील विजयी

दुपारी 13.00 : वरणगाव नगरपरिषदसाठी अपक्ष उमेदवार सुनील काळे यांचा दणदणीत विजय

दुपारी 12.45 : मुक्ताईनगर येथून संजना चंद्रकांत पाटील यांचा विजय

दुपारी 12.40 : नशिराबाद येथून भाजपचे योगेश नारायण पाटील यांचा विजय

दुपारी  12.24 : वरणगाव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील काळे आघाडीवर

दुपारी 12.10 : एरंडोलमधून भाजपा उमेदवार नरेंद्र ठाकूर यांना भक्कम आघाडी

दुपारी 12.04 : सावदा येथून भारतीय जनता पक्षाच्या रेणूका पाटील यांना निर्णयाक आघाडी

सकाळी 11.42 : शेंदुर्णी नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे गोविंद अग्रवाल यांना निर्णायक आघाडी.

सकाळी 11.40 : फैजपूर येथून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुमैयाबी शेख कुर्बान आघाडीवर

सकाळ ११.३२  धरणगाव शहर विकास आघाडीच्या लीलाबाई सुरेश चौधरी यांना भक्कम आघाडी

सकाळी 11.20 : मुक्ताईनगर नगराध्यक्ष दुसऱ्या फेरी अखेर शिवसेनेच्या संजनाताई चंद्रकांत पाटील यांची मोठी आघाडी

सकाळी 11.20 : फैजपूरात राष्ट्रवादी काँग्रेस सुम्मैय्या शेख कुरबान यांना मोठी आघाडी तर सावदा येथून भाजपच्या उमेदवार रेणुका पाटील यांना आघाडी

सकाळी 11.18 : अमळनेर शिवसेनेचे डॉ. परिक्षित बाविस्कर हे आघाडीवर

सकाळी 11.16 : मुक्ताईनगरात शिवसेना शिंदे गटाच्या संजना चंद्रकांत पाटील यांना भक्कम आघाडी

सकाळी 11.14 : चाळीसगाव येथे भाजपच्या उमेदवार प्रतिभा मंगेश चव्हाण यांना भक्कम आघाडी

सकाळी 11.10 : पारोळा नगराध्यक्ष 1ली फेरी अखेर शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील आघाडीवर

सकाळी 11.08 : शहर विकास आघाडीच्या लिलाबाई सुरेश चौधरी यांना आघाडी

सकाळी 11.07 : प्रभाग क्रमांक १ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सिमरण राजेश वानखेडे यांचा विजय

सकाळी 11.04 : सावदा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सुभद्राताई बडगे यांना आघाडी

सकाळी 11.01 : धरणगाव नगरपरिषद प्रभाग क्र. ३ ब -कविता मच्छिंद्र पाटील महाराष्ट्र जनविकास आघाडी (शिवसेना भाजपा महायुती) विजयी

सकाळी 10.59 : रावेर भाजपच्या संगिता महाजन यांना भक्कम आघाडी

सकाळी 10.59 : पारोळ्यात शिवसेनेचे चंद्रकांत भिकनराव पाटील आघाडीवर

सकाळी 10.55 : धरणगाव प्रभाग क्रमांक २ अ मधून प्रमिला आत्माराम शिरसाठ विजयी तर प्रभाग २ ब मधून कविता मश्चिंद्र पाटील (महाराष्ट्र जनविकास आघाडी) विजयी

सकाळी 10.51 : धरणगाव नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक १ अ मधून लक्ष्मण विठोबा माळी (शविआ) हे विजयी झाले, प्रभाग क्रमांक १ ब मधून सुरेखा विजय महाजन विजयी झाले आहे.

सकाळी 10.50 : पाचोरा शहरात शिवसेना सुसाट, प्रभाग एक आणि दोनमधून नगरसेवकपदाचे दोन्ही उमेदवार विजयी.

सकाळी 10.45 : यावलमधून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या छायाताई अतुल पाटील यांना आघाडी.

सकाळी 10.40 : भुसावळमधून भाजपच्या रजनीताई संजय सावकारे यांना चांगली आघाडी.भुसावळच्याच प्रभाग क्रमांक एकमधील भारतीय जनता पक्षाचे दोन्ही उमेदवार विजयी.

सकाळी 10.25 : चाळीसगावमधून भाजपच्या प्रतीभा चव्हाण, चोपड्यात भाजपच्या साधना चौधरी, नशिराबादला भाजपचे योगेश पाटील आघाडीवर. निकाल लागण्याच्या अगोदरच चाळीसगावमध्ये भाजपच्या वतीने विजयी बॅनर फडकले.

सकाळी 10.20 : राज्यभरातील कल महायुतीच्या बाजूने. सर्वाधीक जागांवर भारतीय जनता पक्ष तर या पाठोपाठ शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाची मुसंडी. जळगाव जिल्ह्यात देखील असाच कल राहणार का ? याकडे लक्ष !

सकाळी 10.15 : मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेच्या संजना पाटील, रावेरमध्ये भाजपच्या संगीता महाजन तर अमळनेरमध्ये शहर विकास आघाडीचे जितू ठाकूर आघाडीवर.

सकाळी 10.05 : नगरपालिकेतील टपाली मतदानाची मोजणी संपल्यानंतर प्रत्यक्षात इव्हीएमची मोजणी सुरू होणार आहे. साधारणपणे टपाली मतदानातून सरकारी नोकरांचा कल जाणून घेता येतो.

सकाळी 10.0 : आज सकाळी बरोबर दहा वाजता मतमोजणी सुरू झाली असून पहिल्यांदा टपाली मते मोजण्यात येणार असून यानंतर इव्हीएममधील मते मोजण्यात येणार आहेत. शेंदुर्णी, एरंडोल, नशिराबाद, मुक्ताईनगर, धरणगाव आदी नगरपालिकांमधील निकाल तात्काळ लागणार असून भुसावळ, चाळीसगाव व चोपडा येथे जास्त फेऱ्या असल्याने उशीर लागणार आहे. साधारणपणे दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.


Protected Content

Play sound