जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेसतर्फे ‘सेक्टर इनचार्ज’च्या शिबिरांचे आयोजन

DSC 5133 300x200

जळगाव, प्रतिनिधी | आगामी विधानसभेच्या निवडणुकीची तारीख निवडणूक आयोगातर्फे केव्हाही जाहीर केले जाऊ शकतात. या  पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा काँग्रेस व जळगाव शहर काँग्रेस सक्रीय झाले आहेत. जिल्हा व शहर कॉंग्रेसतर्फे जिल्ह्यात सेक्टर इनचार्ज शिबीरांचे आयोजन रविवारपासून करण्यात येणार आहे.

रविवार ८ सप्टेंबर रोजी ना. गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या जामनेर येथे सकाळी ९ वाजता सेक्टर इनचार्ज शिबिराचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या शिबिरास अखिल भारतीय काँग्रेस सचिव व उत्तर महाराष्ट्र विभागीय प्रभारी चेल्ला वामशी रेड्डी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस विनायकराव देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव व जळगाव जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी डॉ. हेमलता पाटील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर त्याच दिवसी  ८ सप्टेंबर रोजी जळगाव येथे दुपारी २.३० वाजता शिबीर होणार आहे. सोमवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी १०  वाजता फैजपुर तर दुपारी २.३० वाजता भुसावळ येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये काॅग्रेसचा विचार , देशातील आजची परिस्थिती बाबतीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी, या शिबिरांना तरी सर्व त्या विधानसभा क्षेत्रातील सेक्टर इनचार्ज व पदाधिकारी, फ्रंटलचे अध्यक्ष व पदाधिकारी विविध सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे अशी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी व जळगाव शहर काँग्रेस कमिटी तर्फे जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अॅड. संदीप पाटील, जळगाव शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी आवाहन केले आहे.

Protected Content