वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा एड्स प्रतिबंधक विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवला असल्याची माहिती जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे प्रमुख संजय पहूरकर यांनी दिली
जळगाव जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जळगाव यांनी सन २०२४-२५ या वर्षात १२ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर २०२४ intensified कॅम्पेन अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबाबत तसेच वर्षभर जिल्ह्यात शासनाद्वारे दिलेला उद्दिष्टपूर्ती विहित वेळेत केल्यामुळे यशवंतराव चव्हाण सेंटर, जन. जगन्नाथ राव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट मुंबई येथे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई व आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांचेतर्फे जळगाव जिल्हा एड्स नियंत्रण विभाग यांना डॉक्टर किरण पाटील जिल्हा शल्य चिकित्सक व संजय पहुरकर कार्यक्रमाधिकारी राज्यामध्ये जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरीबद्दल यान सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथे पार पडलेल्या या सन्मान सोहळ्यामध्ये स्मृतिचिन्ह आणि प्रशासित पत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉक्टर विजय कांदेवाल, अभिनेता संजय नार्वेकर, अभिनेत्री चेतना भट महाराष्ट्र आरोग्य विभागाचे संचालक आदी मान्यवर उपस्थित होते.