Home क्राईम जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा अयोध्येजवळ अपघात : एक महिला ठार, तीस भाविक जखमी

जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा अयोध्येजवळ अपघात : एक महिला ठार, तीस भाविक जखमी


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कल्याणेहोळ येथील भाविकांच्या वाहनाला अयोध्या जवळच्या सुलतानपूर जवळ अपघात झाला असून यात एका महिलेचा मृत्यू झाला असून सुमारे 30 भाविक जखमी झाले आहेत.

या संदर्भातील माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील कल्याणेहोळ येथील तीस महिला आणि पाच पुरूष भाविकांचा एक ग्रुप अयोध्येसह परिसरात दर्शनासाठी गेला होता. त्यांच्या सोबत जळगाव येथील काही जण देखील होत्ो. हे सर्व जण रेल्वेने काशी येथे गेले. यानंतर त्ो पुढे वाहनाने जात असतांना अयोध्या तीर्थाजवळच्या सुलतानपूर नजीक त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला.

या अपघातात छोटीबाई पाटील (रा. पिंप्राळा, जळगाव) ही महिला मृत्यूमुखी पडली असून अन्य तीस प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिक शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी तातडीने सुलतानपूर येथील प्रशासनाशी संपर्क साधून जखमींवर उपचारासाठी मदत केली. या अपघातात मयत झालेल्या महिलेचे पार्थिव आणि जखमी प्रवाशांना गावी परत आणले जाणार असून याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


Protected Content

Play sound