जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात लसींचा साठा प्राप्त झाल्यामुळे शनिवारी शहरासह जिल्ह्यात लसीकरण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यासाठी लसींचा साठा पुरेसा उपलब्ध नसल्यामुळे लसीकरणाचा वेग हा कमी-जास्त होत आहे. मध्यंतरी दोन दिवस जळगाव शहरातील लसीकरण बंद राहिले होते. यानंतर शुक्रवारी जिल्ह्याला १६ हजार १०० कोविशिल्ड लसीचे डोस शुक्रवारी प्राप्त झाले. यामुळे आज १०७ केंद्रांवर लसीकरण होणार आहे.
जिल्ह्यात जळगाव सामान्य रुग्णालय ७००, भुसावळ रेल्वे हॉस्पिटल २००, भुसावळ मनपा ३००, भुसावळ प्राथमिक आरोग्य केंद्र २००, शाहु रुग्णालय ६००, तरवाडे, चाळीसगाव २००, सोनवद २००, नशिराबाद ४००, नेरी २००. तर उर्वरित केंद्रावर १०० व १५० लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.
दरम्यान, जळगाव शहरात छत्रपती शाहू महाराज रूग्णालय, नानीबाई रूग्णालय, मुलतानी हॉस्पीटल व रेडक्रॉस सोसायटी या चार ठिकाणी लसीकरण होणार आहे.