जळगाव प्रतिनिधी । कोविडच्या प्रतिकारामध्ये अत्यंत महत्वाचे आयुध मानल्या जाणार्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटपाचे अधिकार जिल्हा प्रशासनाकडे असून आज ७६ रूग्णालयांना ४१० इंजेक्शन प्रदान करण्यात आलेत.
जळगाव जिल्ह्यात मध्यंतरी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होते. तसेच याचा काळाबाजार देखील सुरू झाला होता. या पार्श्वभूमिवर, जिल्हा प्रशासनाने जळगाव जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शन वितरणाचे अधिकार स्वत:च्या हाती घेतले असून यासाठी वॉर रूम तयार करण्यात आली होती. याच्याच माध्यमातून आजवर रूग्णाच्या प्रकृतीची खातरजमा करून इंजेक्शनचे वितरण केले जात असे.
तर, अलीकडच्या काळात जिल्हा प्रशासनातर्फे दररोज खासगी रूग्णालयांना डोस दिले जात असून याची माहिती जाहीर केली जात आहे. या अनुषंगाने आज जळगाव जिल्ह्यात ७६ खासगी हॉस्पीटल्सला ४१० इंजेक्शन्सचे वाटप करण्यात आले आहे.
या हॉस्पीटल्सची यादी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली असून आपण खालील लिंकवर क्लिक करून आपल्या शहरातील हॉस्पीटल्सला मिळालेल्या इंजेक्शन्सची माहिती जाणून घेऊ शकतात.