जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयात आज ऑक्सीजन बेडचे लोकार्पण पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे कोविडच्या प्रतिकाराला अजून बळ मिळणार आहे.
जिल्हा रूग्णालयात १५७ ऑक्सीजन बेड उभारण्यात आले असून आज याचे लोकार्पण राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आ. राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत, आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. बी.एन. पाटील, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, सिव्हील सर्जन डॉ. एन. एस. चव्हाण, माजी महापौर विष्णू भंगाळे, रोटरी क्लब जळगाव सेंट्रलच्या अपर्णा भट-कासार, महेंद्र रायसोनी आदी मान्यवर उपस्थित होते.
जळगाव रोटरी क्लब सेंट्रल आणि सदाग्यान फाऊंडेशन यांनी ऑक्सीजन बेडच्या उभारणीमध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांनी दोन वॉर्डमध्ये अनुक्रमे ७६ आणि ३१ अशा १०७ खाटांच्या ऑक्सीजनची व्यवस्था केली आहे. यासाठी लागणारी पाईपलाईन व कंट्रोल पॅनलची उभारणी त्यांनीच केली आहे.
याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यू दर आटोक्यात आला असून आपण ही लढाई जिंकणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. कोरोना विरूध्दच्या लढाईत आता यश मिळत असून संसर्ग वाढला तरी याच्या प्रतिकारासाठी आम्ही सज्ज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तर प्रशासनासह रोटरी क्लबच्या सहकार्याने ऑक्सीजन बेड उभारण्यात आले असून याबाबत त्यांनी कौतुकोदगार काढले.
खाली पहा : ऑक्सीजन बेडच्या लोकार्पणाबाबतचा व्हिडीओ.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/647001659290876