जळगाव प्रतिनिधी । आज रात्रीपासून कडक निर्बंध लागू होत असतांना प्रशासनाने आता सुक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्रासाठीची (मायक्रो कंटेनमेंट झोन) नियमावली जाहीर केली आहे.
आज रात्री आठ वाजेपासून राज्यभरात ब्रेक द चेनच्या अंतर्गत नवीन कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यासोबत आता मायक्रो कंटेनमेंट झोनसाठीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात गृहनिर्माण संस्था किंवा इमारतीत मध्ये पाच पेक्षा जास्त कोविड-१९ बाधित रुग्ण असतील, अशा ठिकाणी सुक्ष्म प्रतिबंधित म्हणजेच मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याबाबत महसुल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार निमावली जाहिर करण्यात आली आहे.
त्यानुसार जिल्ह्यात गृहनिर्माण संस्था किंवा इमारतीत मध्ये पाच पेक्षा जास्त कोविड-१९ बाधित रुग्ण असतील. अशी ठिकाणे सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याबाबतच्या सुचना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.