जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा विळखा घट्ट होत असतांना बरे होणार्यांची संख्या देखील वाढीस लागली आहे. आज लागोपाठ दुसर्या दिवशी बरे होणार्यांचा आकडा हा बाधितांपेक्षा जास्त आढळून आला आहे. गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ११९४ कोरोना बाधीत आढळले असले तरी १२२४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-२३२, जळगाव ग्रामीण-२६, भुसावळ-३६, अमळनेर-१०७, चोपडा-२००, पाचोरा-४२, भडगाव-३४, धरणगाव-९०, यावल-२२, एरंडोल-४२, जामनेर-८९, रावेर-१३, पारोळा-१७, चाळीसगाव-५१, मुक्ताईनगर-७३, बोदवड-८ इतर जिल्ह्यातील १२ असे एकुण १ हजार १९४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा रूग्णालयाने दिलेल्या आजच्या अहवालात आजवर जिल्ह्यात ९२ हजार ४२१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ७९ हजार १८० रूग्ण आढळून आले आहे. तर ११ हजार ५७३ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आजच जिल्ह्यात १५ बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.