जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग अल्प प्रमाणात का होईना थोडा कमी झाला असून आज ९३६ कोरोना बाधीत पेशंट आढळून आले असले तरी १०६१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या ही बाराशेच्या आत होती. तर आता हा आकडा काहीसा कमी झाल्याचे दिसून आले आहे. आज दिवसभरात पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ही पुन्हा एकदा हजारच्या आत म्हणजेच ९३६ इतकी झाली आहे. तर गत चोवीस तासांमध्ये ११६१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आता बाधीतांपेक्षा बरे होणार्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. तर आज दिवसभरात जिल्ह्यात १६ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजच्या रूग्णसंख्येचा विचार केला असता पुढील प्रमाणे रूग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहर-१५३; जळगाव ग्रामीण-३४; भुसावळ-१३१; अमळनेर-९६; चोपडा-४२; पाचोरा-५८; भडगाव-१८; धरणगाव-२७; यावल-३३; एरंडोल-२६; जामनेर-५२; रावेर-६५; पारोळा-२२; चाळीसगाव-८६; मुक्ताईनगर-२५; बोदवड-४८ आणि इतर जिल्ह्यांमधील १७ असे रूग्ण आढळून आले आहेत.