कोरोनाचा जोर आजही कायम ; जिल्ह्यात ९७९ रुग्ण

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कायम असून आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ९७९ रूग्ण आढळून आले आहेत. तर यातील ३७६ पेशंट हे जळगावातील असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर- ३७६, जळगाव ग्रामीण- ११, भुसावळ- १३७ , अमळनेर- १६, चोपडा-१०१, पाचोरा-२७, भडगाव-३२, धरणगाव- ८८,  यावल-१२, एरंडोल- ९२, जामनेर- ३४, रावेर- १४ , पारोळा- ४, चाळीसगाव- १०, मुक्ताईनगर- ०, बोदवड- १९ आणि इतर जिल्ह्यातील १२ असे एकुण ९७९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात एकुण ७० हजार ६२७ बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी ६१ हजार ६०२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ७ हजार ५८१ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज देखील ६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकुण १ हजार ४४४ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ एन.एस. चव्हाण यांनी कळविली आहे.एक दिलासादायक बाब अशी की, आज दिवसभरात ६६७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे एकीकडे रूग्ण आढळून येत असतांना दुसरीकडे बरे होणार्‍यांची संख्या देखील वाढू लागल्याचे दिसून येत आहे.

Protected Content