जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ११८५ कोरोना बाधीत आढळून आले असून यात जळगाव शहर व तालुक्यासह भुसावळ तालुक्यात संसर्गाचा स्फोट झाल्याचे दिसून येत आहे. तर दिवसभरात १८ रूग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.
जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या माहितीनुसार गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल ११८५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ११६० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज जिल्हाभरात तब्बल १८ बाधीतांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
आज दिवभरात जळगाव शहर-२८७; जळगाव तालुका- ९४; भुसावळ तालुका- १९६; अमळनेर-९३; चोपडा-१३; पाचोरा-४९; भडगाव-४५; धरणगाव-३९; यावल-३०; एरंडोल-७९; जामनेर-४४; रावेर-६९; पारोळा-२९; चाळीसगाव-५९; मुक्ताईनगर-८; बोदवड- ३७ आणि इतर जिल्ह्यांमधील-३ असे रूग्ण आढळून आले आहेत.