जळगाव प्रतिनिधी । गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ११७९ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून याच कालावधीत ११५९ पेशंट बरे झाले आहेत. तर जळगाव शहरासह चोपडा आणि भुसावळात कोरोनाचा सुपर स्प्रेड आज देखील दिसून आला आहे.
जळगाव जिल्ह्यात आज देखील एक हजारापेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत. गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ११७९ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून याच कालावधीत ११५९ पेशंट बरे झाले आहेत. आज देखील सर्वाधीक रूग्ण हे चोपडा तालुक्यातील असून तेथील रूग्णसंख्येचा आकडा २५७ इतका आहे. याच्या खालोखाल जळगाव शहरात २४८ पेशंट आढळून आले आहेत. तर भुसावळ तालुक्यात १५५ पेशंट आढळले आहेत.
उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण-२३; अमळनेर-५१; पाचोरा-३६; भडगाव-३९; धरणगाव-६१; यावल-५२; एरंडोल-३७; जामनेर-५५; रावेर-६८; पारोळा-३२; चाळीसगाव-६; मुक्ताईनगर-९; बोदवड-४९ आणि इतर जिल्ह्यातील १ असे रूग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल १४ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. यातील सर्वाधीक ३ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत.