तापी महामंडळात अधिकारी व कंत्राटदाराची मिलीभगत : जाणून घ्या माहिती (Video)

जळगाव प्रतिनिधी । तापी पाटबंधारे महामंडळात चक्रधर कन्स्ट्रक्शन या कंपनीलाच ठेका मिळावा म्हणून अधिकारी व कंत्राटदाराने केलेले दबावतंत्र उघडकीस आले असून या प्रकरणी आज अखील चौधरी यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तापी पाटबंधारे महामंडळातील गैरप्रकार हे आधी देखील उघडकीस आले आहेत. यात आता एका नव्या प्रकाराची भर पडली आहे. आज अखील चौधरी या कंत्राटदाराने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन याला वाचा फोडली आहे. या निवेदनात म्हटले आहे की-

तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत आपल्या विभागाकडून वरणगाव तळवेल उपसा सिंचन प्रकल्पाच्या माळेगांव, हरताळा शिवार ता.मुक्ताईनगर, ओझरखेडा डॅम ता.भुसावळ जि. जळगाव येथे डब्ल्यु.बी.एम. रस्ते बांधकाम कामाची संदर्भीत नमूद निविदा वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या कामाचे अंदाजपत्रक रु.११ कोटी ५२ लाख रूपये एवढे असून कामाची मुदत ८ महिने आहे. निविदा भरण्याची अंतिम मुदत दिनांक २९ जुलै २०२१ ही होती. तर इच्छुक निविदा पारकांना आवश्यक डॉक्युमेंट, कामाच्या अभियंत्यांसह फोटो अपलोड करण्यासाठी शुक्रवार दिनांक २३ जुलै ही मुदत देण्यात आलेली होती. या मुदतीत इच्छुक निविदा धारकांना डॉक्युमेंट्स व अभियंत्यांसह ऑनलाइन अपलोडिंग करणे आवश्यक होते. निविदेतीत या अटी-शर्ती प्रमाणे संदर्भाय नमूद कामाचे टेंडर भरण्यासाठी सदर कामाची जबाबदारी असणार्‍या मुक्ताईनगर तालुक्यातील अभियंते टी. पी. राजपूत यांच्या निविदा भरण्याची आवश्यक असलेला फोटो अपलोड करण्यासाठी शुक्रबार दिनांक २३ जुलै २०२१ रोजी मी जळगाव येथून मुक्ताईनगर येथे वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजना कार्यालयात येथे गेलेलो होतो.

जाण्यापूर्वी अभियंता टी.आर. राजपूत यांना त्यांचा मोबाईल क्रमांकाद्वारे संपर्क साप्त निविदा भरण्यासाठी आवश्यक असलेले फोटो अपलोड करण्यासाठी मी येत असल्याची माहिती दिली होती. परंतू निविदा प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग करून अभियंता टी. आर. राजपूत यांनी चक्रधर कंट्रक्शन प्रा. लि. रावेर जिल्हा जळगाव याच्या प्रतिनिधीला भी संदर्भीय कामाची निविदा भरण्यासाठी येत असल्याची माहिती पुरविली असल्याचे माझ्या निदर्शनास आले. मी निविदा शेतीतील अटीप्रमाणे अभियंता टी.पी. राजपूत यांच्यासह फोटो काढून अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतानाच जाणीवपूर्वक फोटो अपलोड करण्यासाठी विलंब होईल अशाप्रकारे अभियंता टी.पी. राजपूत यांनी चालढकल सुरू केली. यावेळी ते कोणाची तरी वाट पाहत असल्याचे त्यांच्या एकंदर संशयास्पद हावभावातून लक्षात आले.

दरम्यान मला फोन आता. यात मी चक्रधर कन्स्ट्रक्शन चा महेंद्र बोलतोय, तुम्ही जी निविदा भरण्यासाठी व डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आले आहेत. हे काम स्थानिक आमदाराच्या अखत्यारीतील असल्याने मी करणार आहे. तुम्ही या कामाची निविदा भरू नका. तुमच्या भल्या साठी सांगतो. सदर निविदा भरणे तुमच्या साठी चांगले होणार नाही, काय ते तुम्ही समजून घ्या, अशा शब्दात संबंधितांनी मला अप्रत्यक्ष धमकावले. हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे.

कोणतीही निविदा प्रक्रिया राबवताना स्पर्धात्मक वातावरण निश्‍चितपणे असते. परंतु निविदा पारकांची माहिती अन्य निविदा धारकांना पुरविणे हा कार्यालयीन शिस्तभंगाच्या प्रकार असून अभियंता टी.पी. राजपूत यांनी गोपनीयतेचा भंग करून निविदा भरण्यासाठी येत असल्याची माहिती चक्रधर कंट्रक्शन यांना पुरविल्याने कर्तव्यभंग केलेला आहे. चक्रधर कंट्रक्शन चे महेंद्र नामक व्यक्तीने मला फोन करून निविदा भरू नको यासाठी वापरलेली धमकीयुक्त भाषा केवळ अभियंता टी. पी.राजपूत यांनी निविदा भरत आहे अशी माहिती पुरविल्याने वापरण्यात आली.

अशा परिस्थितीत फोटो अपलोड करायचे असल्याने अभियंता टी. पी. राजपूत यांना मी विनंती करत असताना त्यांनी मुद्दाम चालढकल करून मला निविदा भरता येणार नाही व त्यासाठी लागणारे निविदा अटी शीतील डॉक्युमेंट, फोटो अपलोड करता येणार नाही यासाठी अडथळे आणले. भी निविदा सूचने तील अटी प्रमाणे डॉक्युमेंट, फोटो अपलोड करत असतानाच अभियंता टी.पी.राजपूत यांच्या कार्यालयाबाहेर सुमारे २० ते २५ अज्ञात, अनोळखी लोकांचा घोळका जमा झाला. हे लोक येताच अभियंता टी.पी.राजपूत यांनी मला बाहेर काय होत आहे हे लक्षात घ्या. असे सांगितल्याने नेमका काय प्रकार होत आहे हे पाहण्यासाठी मी बाहेर येताच या अनोळखी लोकांनी सदर काम स्थानिक आमदारांनी सांगितल्यामुळे फक्त चक्रधर कन्स्ट्रक्शन करणार आहे. तुम्ही निविदा भरू नका असा एकच गदारोळ सुरु केला. अभियंता टी. पी.राजपूत यांनी या लोकांना थांबविण्याचा व रोखण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. या गदारोळात डॉक्युमेंट व फोटो अपलोड करण्यासाठी निविदा सुचनेत नमूद मुदत मुदत उलटुन गेली. यामुळे मला पान. एकच डॉक्युमेंट फोटो अपलोड करता आता. हे सर्व अत्यंत विचारपूर्वक कट कारस्थान रचून चक्रधर कस्ट्रक्शन कंपनीने अभियंता टी. पी.राजपूत यांना हाताशी धरून संगनमताने केले आहे.

संदर्भिय कामाची कोणीही निविदा भरू नये व एकमात्र चक्रधर कन्स्ट्रक्शन यांचीच निविदा भरली जावी. यासाठी जाणीव पूर्वक मला निविदा प्रक्रियेतील अटी शर्ती प्रमाणे डॉक्युमेंट फोटो अपलोड करता येणार नाही म्हणून अडथळे निर्माण करून मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धमकाविण्याचा, जमा व जमवून दहशत बसविण्याचा प्रयत्न झाला आहे.यास सर्वस्वी अभियंता टी.पी.राजपूत हेच जबाबदार असून ते शासकीय कर्मचारी असताना चक्रपर कन्स्ट्रक्शनचे आज्ञाधारी सेवक म्हणून काम करीत आहेत. वास्तविक एखाद्या कामासाठी अनेक निविदा प्राप्त होणे हे आदर्श स्पर्धात्मक वातावरण बाबत शासनाला अपेक्षित असते.

या सर्व घटनेची बिना विलंब तातडीने चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच निविदा धारकांची माहिती अन्य निविदा पारकांस पुरवून निविदा प्रक्रियेतील गोपनीयतेच्या भंग करून विशिष्ट ठेकेदार एजन्सी ला ठेका मिळवा व लाभ मिळावा यासाठी यंत्रणेचा गैरवापर करणार्‍या अभियंता टी.पी.राजपूत यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा(शिस्त व अपिले) अधिनियम १९७९ अन्वये शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी. कोणत्याही कामाची निविदा काढताना त्या कामासाठी एकापेक्षा अनेक निविदा प्रार व्हाव्यात व आदर्श स्पर्धात्मक वातावरणातून सर्व पात्रता व अटी शर्ती पूर्ण करणार्‍या निविदा धारकास काम मिळावे. म्हणजे अशा कामात गैरप्रकार होत नाही असा संकेत आहे.
परंतु संदर्भाय नमूद निविदा काढताना विशिष्ट ठेकेदार एजन्सीला लाभ मिळावा अशा पद्धतीचे प्रयत्न होत असल्याने यात सामील सर्व संबंधितांवर व कारवाई होण्यासाठी तातडीने चौकशी करणे आवश्यक आहे.

दरम्यान, या निवेदनात कंत्राटदार अखील चौधरी यांनी खालील मागण्या केल्या आहेत.

अ) विशिष्ट ठेकेदार एजन्सीला लाभ पोहोचवण्यासाठी त्यांची एकमात्र निविदा मंजूर व्हावी म्हणून मला निविदा प्रक्रियेतील डॉक्युमेंट्स व फोटो अपलोड करण्यास जाणीवपूर्वक आणले गेल्याने निविदा क्रमांक ०१ सन २०२१-२०२२ मध्ये डॉक्युमेंट फोटो अपलोड करण्यासाठी मुदतवाढ मिळावी.

ब) मी निविदा भरणार असल्याची माहिती अन्य निविदा भारतात पुरवून गोपनीयतेचा व कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी अभियंता टी.पी. राजपूत यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई व्हावी.

क) चक्रधर कन्स्ट्रक्शनच्या महेंद्र नामक इसमाची व त्यांरी आतापर्यंत पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत उपसा सिंचन योजनेसाठी केलेल्या सर्व कामांची, प्राप्त निविदा, जमाखर्चाची चौकशी करण्यात यावी.

ड) सदर तक्रार अर्जाची चौकशी होईपर्यंत संदर्भीय निविदा कोणत्याही ठेकेदार एजन्सीला मंजूर करण्यात येऊ नये.

कंत्राटदार अखिल संतोष चौधरी यांनी हे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

धमकावल्याचीही तक्रार

कंत्राटदार अखिल चौधरी यांनी या निवेदनात आपल्याला धमकावण्यात आल्याचीही तक्रार केली आहे. यात म्हटले आहे की, आपण २८ जुलै रोजी सकाळी ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास माझ्या पत्नीला भेटायला माझ्या सासरी अयोध्या नगर, जळगाव गेल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या सासन्यांच्या घराबाहेरील परिसरात दोन इसम मोटरसायकलीवर येत त्यांनी मला दम दिला. तुला निविदा भरण्यास चक्रधरचे महेंद्र भाऊ यांनी सांगितले नसतानाही तू आगाऊपणा का करतो आहे. तू तुझा विचार ठेव असा दम व धमकी देऊन ते निघून गेले. सातत्याने धमकावण्याचे प्रकार होत असल्याने माझ्या जीविताचे बरेवाईट करण्याचा प्रयत्न संबंधितांकडून सुरू असल्याची जाणीव मला झाली असून तसे झाल्यास चक्रधर कंट्रक्शनचे महेंद्र नामक इसम तसेच मला साइटवर धमकाविण्यासाठी आलेले त्यांचे २५ ते ३० गुंड सहकारी साथीदार आणि अभियंता टी.पी.राजपूत, उपसा बांधकाम विभाग, जळगाव मधील सर्व संबंधित अधिकारी अभियंते व कर्मचारी (ज्यांचा या निविदा प्रक्रियेत प्रत्यक्ष-अ सहभाग आहे) हेच जबाबदार राहतील. अशी तक्रार मी कार्यकारी अभियंता, उपसा सिंचन बांधकाम जळगाव कडलग साहेब, यांच्याकडे केल्यानंतर तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक स्वामी साहेब यांच्याकडे केली असून त्यावर अद्यापही कोणतीही कार्यवाही झाली नाही.

या सर्व प्रकाराबाबत कंत्राटदार अखील संतोष चौधरी यांनी दिलेली माहिती आपण खालील व्हिडीओत पाहू शकतात.

https://www.facebook.com/508992935887325/videos/1154285811726120

Protected Content