जळगाव शहर कचरामुक्त करणार : आयुक्त उदय टेकाळे

aayuk dr uday tekale 1

जळगाव (प्रतिनिधी) महापालिकेची आथिक परिस्थिती बळकट करण्यासाठी मालमत्ता कराच्या वसुलीवर भर राहीलच. त्याचसोबत घनकचरा प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करुन जळगाव शहर कचरामुक्त करण्याचा संकल्प महापालिकेचे नूतन आयुक्त उदय टेकाळे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला. दरम्यान, आज आयुक्त टेकाळे हे सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेणार आहेत.

 

महापालिकेचे नवीन आयुक्त उदय टेकाळे यांनी शुक्रवारी दुपारी आयुक्तपदाचा पदभार मावळते आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याकडून स्विकारला. यावेळी मावळते आयुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, लक्ष्मीकांत कहार हे उपस्थित होते. टेकाळे यांनी सांगितले की, आपण याआधी स्वच्छ भारत अभियानाचे संचालक म्हणून काम केले असल्याने माझा भर शहराची सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य व स्वच्छतेवर राहणार आहे. परंतु त्याच बरोबर वसुलीवर देखील भर दिला जाईल. दरम्यान, आज आमदार राजूमामा भोळे,महापौर सीमाताई भोळे, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांच्यासह नगरसेवक भेट घेणार आहेत.

Add Comment

Protected Content