जळगाव प्रतिनिधी । घरातील सर्वजण झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी खिडकीतून पाकीट चोरून पाच हजार रूपये रोख व इतर कागदपत्रे लंपास केल्याचा प्रकार आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किसन मंगलदास वैष्णव रा.सेन्ट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रात्री 11 वाजता सर्वजणे जेवण करून झोपले. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांने घरातून पाकीट चोरून नेत पाकिटातील पाच हजार रूपये रोख आणि पॅनकार्ड, आधारकार्ड आणि एटीएम कार्ड चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी रवी पाटील आणि रूपेश ठाकरे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.