जळगाव प्रतिनिधी । घराच्या समोर कंपाऊंडच्या आत पार्कींगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. दिवसभर इतरत्र शोधून काढले असता ती मिळून न आल्याने रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर चिंतामण पाटील वय 30 शिवराणा नगर यांनी रविवारी रात्री नेहमी प्रमाणे बजाज प्लॅटीना (एमएच 19 डीई 5527) हा घरासमोरील कंपाऊंडच्या आत लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दारासमोर लावलेली दुचाकी चोरून नेली हा प्रकार सोमवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.