जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवाजी नगरमध्ये आज सकाळी एसटी बस अचानक खड्यात अडकली. सुदैवाने यावेळी कुणालाही दुखापत झाली नाही.
या संदर्भात अधिक असे की, आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास चोपड्याकडून जळगावला एसटी बस येत होती. शिवाजी नगरमधील माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या बंगल्या समोर अमृत योजनेसाठी केलेल्या खड्ड्डा साचलेल्या पावसामुळे बस चालकाच्या लक्षात आला नाही. त्यामुळे बस थेट खड्यात गेली. सुदैवाने कोणत्याही प्रवाशास दुखापत झाली नाही.