Home क्राईम जळगावात आर्थीक व्यवहारातून दोघांवर चाकू हल्ला

जळगावात आर्थीक व्यवहारातून दोघांवर चाकू हल्ला


जळगाव प्रतिनिधी । आर्थीक देवाण घेवाणातून दोघांवर चाकू हल्ला झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली असून यात दोघे जण जखमी झाले. हल्लाप्रकरणी शहर पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. मात्र दोघाना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील चित्रा चौकातील मस्ताना पान सेंटरजवळी योगेश प्रदिप महाजन (वय-25) आणि रोहित गिरीश मुंडे (वय-25) हे दोघे रा. शिव कॉलनी हे घराकडे जात असतांना तेथे आरोपी चारुदत्त रवी पाटील रा. बळीराम पेठ आणि अफजल खान कबीर खान दोन्ही रा. मास्टर कॉलनी यांनी येवून चाकून हल्ला केला. या हल्ल्यात योगेश महाजन यांच्या उजव्या पायावर धारदार शस्त्राने वार केले तर रोहित मुंडे किरकोळ जखमी झाला. दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा हल्ला पैश्यांच्या वादातून झाला आहे असे बोलले जात आहे. शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या कामी विजयसिंग पाटील, प्रीतम पाटील यांनी दोघाना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound