जळगाव प्रतिनिधी । काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा, कलम ३७० हटविण्याची गेल्या अनेक वर्षापासून असलेली मागणी लवकरच पूर्ण होणार असून त्याबाबतची शिफारस सोमवारी केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शाह यांनी राज्यसभेत मांडली. मोदी सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचे जळगावात श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे स्वागत करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष कैलास सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी टॉवर चौकात फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.
काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यासाठी राज्यसभेत शिफारस मांडण्यात आली असून तो प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयाचे श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे स्वागत करण्यात आले. टॉवर चौकात जमलेल्या सर्व देशभक्तांनी दूध मांगोगे तो खीर देंगे, काश्मीर मांगोगे तो चीर देंगे, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत जल्लोष केला. यावेळी तिरंगा फडकवित फटाके फोडण्यात आले तसेच पेढे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, भरत कोळी, संदीप मंडोरे, बाळू नांद्रे, मनोज चौधरी, रतीलाल सपकाळे, संजय जोशी, अशोक सोनवणे, रईस खाटीक, संदीप पाटील, कल्पेश सोनवणे, सागर सोनवणे, संजय पाटील, विलास सोनवणे, सादिक खाटीक, रवी चौधरी आदींसह अनेक जळगावकर नागरिक व देशप्रेमी उपस्थित होते.