
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील तीन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोख रक्कम चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, दररोज होणाऱ्या चोरी, घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयटीआयच्या मागील वर्धमान स्कूल जवळ राहणारे सेवानिवृत्त प्राध्यापक अशोक जनार्दन चौधरी (वय 65) हे आपल्या पत्नी वसुंधरा यांच्यासह पुण्याला राहणारे अंकुश आणि पियुष मुलांकडे भेटण्यासाठी 31 ऑगस्ट रोजी गेले होते. आज सकाळी शेजारच्यांच्या त्यांची घरी घरफोडी झाल्याचे लक्षात आले. याबाबत अशोक चौधरी यांना फोनवरून संपर्क साधत घटनेची माहिती देऊन शेजारच्यांनी पोलिसांना कळविले.त्यानुसार जिल्हापेठ पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. यावेळी दोन मजली इमारतीतील सर्वसामान्यांची अस्ताव्यस्त केले होते. मात्र कुठलीही रोख रक्कम किंवा दागिने चोरीस गेले नसल्याचे चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, चौधरी यांनी पैसे,दागिने कपाटात न ठेवतात. दुसरीकडे लपवून ठेवल्यामुळे चोरट्यांच्या हाती लागले नाहीत. याबाबत जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरटा विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
दुसऱ्या घटनेतील आनंद कॉलनीत राहणाऱ्या सुभद्राबाई मधुकर चौधरी (वय 60) यांच्या घरात कोणीही नसताना अज्ञात चोरट्याने घराच्या मागच्या भागातून कटरच्या साह्याने कुलूप तोडून आत प्रवेश करत तीन हजार रुपयांची रोकड लंपास केली. यावेळी सुभद्राबाई चौधरी या गावातच राहणाऱ्या आपली मुलगी अर्चना गणेश पाटील हिच्याकडे भेटण्यासाठी गेल्या होत्या. तसेच त्यांच्या शेजारी राहणारे भगवान आनंदा हरणे हेदेखील बाहेरगावी पुण्याला कुटुंबियांसोबत गेले होते. त्यांचे देखील बंद कर फोडले. परंतू किती रक्कम चोरीस गेला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.