जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भगवान परशुराम जयंती उत्सवासाठी बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे विविध समित्यांचे गटन करण्यात आले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, दरवर्षाप्रमाणेच यंदा देखील भगवान परशुराम जयंती बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे ३ मे रोजी जल्लोषात साजरी केली जाणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत. यात १ मे रोजी मोटारसायकल रॅली, २ मे रोजी सायंकाळी व्याख्यान, ३ मे रोजी सायंकाळी ५ वाजेपासून शहरातील रथचौकातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. यंदा कार्यकारिणीची नेमणूक न करता प्रत्येक प्रमुख व्यक्तीला एकेका समितीचे प्रमुख पद देण्यात आले. या अंतर्गत स्वागत समिती अध्यक्ष डॉ. अजित नांदेडकर, संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड, लेखराज उपाध्याय, सुरेंद्रनाथ मिश्रा, संजय व्यास, अशोक वाघ, विश्वनाथ जोशी, शिव शर्मा, देणगी समिती प्रमुख संजय कुळकर्णी, राजेश नाईक, पंकज पवनीकर, सचिन कुळकर्णी, शोभायात्रा समिती प्रमुख मोहन तिवारी, श्याम दायमा, अजय डोहोळे, महावीर पंचारिया, केदार पंचारिया, आनंद तिवारी, नंदू उपाध्ये, संजय शुक्ला; प्रचार समिती प्रमुख सौरभ चौबे, यामिनी कुळकर्णी, कमलाकर फडणीस, राहुल कुळकर्णी, केदार जोशी, विग्रह सेवा गोपाल पंडित, हिशेब समिती ड सुहास जोशी, श्याम नागला, धार्मिक संस्कार भूषण मुळे, राजाभाऊ जोशी, मंडप समिती महेश दायमा, विनोद रामावत, दीपक बोरायडा, महाप्रसाद सुरज दायमा, सुरेश शर्मा, सतीश दायमा, विकास शुक्ल, लक्ष्मीकांत त्रिपाठी, सुनील याज्ञिक, वितरण समिती ः महेंद्र पुरोहित, गोविंद ओझा, राजू पुरोहित, शिव रामावत, किरण कुळकर्णी, व्यासपीठ सेवा पीयूष रावळ, अमोल जोशी, शुभदा कुळकर्णी, मंगला पुरोहित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यासोबत ढोल-ताशे व लेझीम पथक व्यवस्था अक्षय जोशी, शेखर कुळकर्णी, डॉ. नीलेश राव, विशाल शर्मा, प्रकाश शर्मा, राजेश शर्मा, स्वप्नगंधा जोशी, मानसी जोशी, कमलाबाई काकडा, वृषाली जोशी, प्रियंका त्रिपाठी, राजश्री रावळ, समन्वय समिती किसन अबोटी, स्टॉल सेवा स्वाती कुळकर्णी, सविता नाईक, साधना दामले, श्रीरंग पुराणकर, अनंतराव जोशी, रथ सजावट समर्थ खटोड, हर्षल संत, अमोल जोशी, जितेंद्र याज्ञिक, योगेश शुक्ल, प्रार्थना छाया त्रिपाठी, रोहिणी कुळकर्णी, नम्रता कुळकर्णी, स्वच्छता समिती प्रमुख नितीन बापट यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आलेला आहे.