जळगाव प्रतिनिधी । निवडणूक आयोगाने जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाची अचूक आकडेवारी आज जाहीर केली आहे. यात जळगावात ५६.११ तर रावेरात ६१.४० टक्के मतदान झाले आहे.
काल रात्री उशीरापर्यंत नेमके किती मतदान झाले याबाबत घोळ सुरू होता. यामुळे जळगाव व रावेरात अंदाजे ५६ आणी ६२ टक्क्यांची नोंद होणार असल्याचे स्पष्ट झाले होता. दरम्यान, आज दुपारी निवडणूक आयोगाने मतदानाची अचूक आकडेवारी जाहीर केली आहे. यात जळगावात ५६.११ तर रावेरात ६१.४० टक्के मतदान झाले आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघात पुरुष मतदार १०,०८,८१८, स्त्री मतदार ९,१६,४७०, इतर मतदार ६४, एकूण मतदार १९,२५,३५२, मतदान केलेले मतदार पुरुष ५,८४,४६५, स्त्री ४,९५,८१५, इतर १३ असे एकूण मतदान केलेले मतदार १०,८०,२९३, मतदानाची टक्केवारी पुरुष ५७.९४ टक्के, स्त्री ५४.१० टक्के, इतर २०.३१ टक्के अशी एकूण ५६.११ टक्के मतदान झाले.
तर रावेर लोकसभा मतदार संघात मतदार पुरुष ९,२३,६२७, स्त्री ८,४९,४५१, इतर २९, एकूण १७,७३,१०७, मतदान केलेले मतदार पुरुष ५,८३,४२७, स्त्री ५,०५,२६२, इतर १ असे एकूण मतदान केलेले मतदार १०,८८,६९०, मतदानाची टक्केवारी पुरुष ६३.१७ टक्के, स्त्री ५९.४८ टक्के, इतर ३.४५ टक्के अशी एकूण ६१.४० टक्के मतदान झाले.
जळगाव मतदार संघातील विधानसभा मतदार संघनिहाय मतदान पुढीलप्रमाणे आहे.
१३ जळगाव शहर विधानसभा मतदार संघ – पुरुष मतदार २,०६,९६८, स्त्री मतदार १,८४,३५३, इतर मतदार ३२, असे एकूण मतदार ३,९१,३५३, मतदान केलेले मतदार पुरुष १,०६,७०३, स्त्री ८५,५९५, इतर ४, एकूण मतदार- १,९२,३०२, मतदानाची टक्केवारी पुरुष ५१.५६, स्त्री ४६.४३ आणि इतर १२.५० अशी एकूण ४९.१४ टक्के मतदान.
१४ जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघ – पुरुष मतदार १,६४,०४५, स्त्री मतदार १,५०,४११, इतर मतदार २, असे एकूण मतदार ३,१४,४५८, मतदान केलेले मतदार पुरुष १,०२,२९७, स्त्री ८७,७७८, इतर निरंक, एकूण मतदार- १,९०,०७५, मतदानाची टक्केवारी पुरुष ६२.३६, स्त्री ५८.३६, इतर निरंक अशी एकूण ६०.४५ टक्के मतदान.
१५ अमळनेर विधानसभा मतदार संघ – पुरुष मतदार १,५१,७७२, स्त्री मतदार १,४०,२५८, इतर मतदार ७, असे एकूण मतदार २,९२,०३७, मतदान केलेले मतदार पुरुष ८३,४७१, स्त्री ७२,७७२, इतर निरंक, एकूण मतदार- १,५६,२४३, मतदानाची टक्केवारी पुरुष ५५.००, स्त्री ५१.८८, इतर निरंक अशी एकूण ५३.५० टक्के मतदान.
१६ एरंडोल विधानसभा मतदार संघ – पुरुष मतदार १,४४,५८७, स्त्री मतदार १,३४,४२०, इतर मतदार ३, असे एकूण मतदार २,७९,०१०, मतदान केलेले मतदार पुरुष ८८,५७१, स्त्री ७६,९०५, इतर १, एकूण मतदार- १,६५,४७७, मतदानाची टक्केवारी पुरुष ६१.२६, स्त्री ५७.२१, इतर ३३.३३ अशी एकूण ५९.३१ टक्के मतदान.
१७ चाळीसगाव विधानसभा मतदार संघ – पुरुष मतदार १,७९,९८१, स्त्री मतदार १,५९,४२२, इतर मतदार १८, असे एकूण मतदार ३,३९,४२१, मतदान केलेले मतदार पुरुष १,०७,६२३, स्त्री ८९,९२५, इतर ८, एकूण मतदार- १९७५५६, मतदानाची टक्केवारी पुरुष ५९.८०, स्त्री ५६.४१, इतर ४४.४४ अशी एकूण ५८.२० टक्के मतदान.
१८ पाचोरा विधानसभा मतदार संघ- पुरुष मतदार १,६१,४६५, स्त्री मतदार १,४७,६०६, इतर मतदार २, असे एकूण मतदार ३,०९,०७३, मतदान केलेले मतदार पुरुष ९५,८००, स्त्री ८२,८४०, इतर निरंक, एकूण मतदार- १,७८,६४०, मतदानाची टक्केवारी पुरुष ५९.३३, स्त्री ५६.१२, इतर निरंक अशी एकूण ५७.८० टक्के मतदान.
तर रावेर लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघनिहाय मतदान पुढीलप्रमाणे.
१० चोपडा विधानसभा मतदार संघ- पुरुष मतदार १,५८,१४६, स्त्री मतदार १,४९,१२८, इतर मतदार १, असे एकूण मतदार ३,०७,२७५, मतदान केलेले मतदार पुरुष ९९,६४६, स्त्री ८८,६९४, इतर निरंक, एकूण मतदार- १,८८,३४०, मतदानाची टक्केवारी पुरुष ६३.०१, स्त्री ५९.४८, इतर निरंक अशी एकूण ६१.२९ टक्के मतदान.
११ रावेर विधानसभा मतदार संघ- पुरुष मतदार १,५४,५३७, स्त्री मतदार १,४२,६१४, इतर मतदार १, असे एकूण मतदार २,९७,१५२, मतदान केलेले मतदार पुरुष १,०४,०४९, स्त्री ९१,५२३, इतर निरंक, एकूण मतदार- १,९५,५७२, मतदानाची टक्केवारी पुरुष ६७.३३, स्त्री ६४.१८, इतर निरंक अशी एकूण ६५.८२ टक्के मतदान.
१२ भुसावळ विधानसभा मतदार संघ- पुरुष मतदार १,५९,४४९, स्त्री मतदार १,४३,८०२, इतर मतदार २२, असे एकूण मतदार ३,०३,२७३, मतदान केलेले मतदार पुरुष ८६,६२६, स्त्री ७२,२५७, इतर १, एकूण मतदार- १,५८,८८४, मतदानाची टक्केवारी पुरुष ५४.३३, स्त्री ५०.२५, इतर ४.५५ अशी एकूण ५२.३९ टक्के मतदान.
१९ जामनेर विधानसभा मतदार संघ- पुरुष मतदार १,६०,१९५, स्त्री मतदार १,४७,१०२, इतर मतदार ४, असे एकूण मतदार ३,०७,३०१, मतदान केलेले मतदार पुरुष ९८,९४५, स्त्री ८५,५६९, इतर निरंक, एकूण मतदार- १,८४,५१४, मतदानाची टक्केवारी पुरुष ६१.७७, स्त्री ५८.१७, इतर निरंक अशी एकूण ६०.०४ टक्के मतदान.
२० मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघ- पुरुष मतदार १,५०,५१५, स्त्री मतदार १,४०,६१६, इतर मतदार १, असे एकूण मतदार २,९१,१३२, मतदान केलेले मतदार पुरुष ९६,९८३, स्त्री ८५,५०३, इतर निरंक, एकूण मतदार- १,८२,४८६, मतदानाची टक्केवारी पुरुष ६४.४३, स्त्री ६०.८१, इतर निरंक अशी एकूण ६२.६८ टक्के मतदान.
२१ मलकापूर विधानसभा मतदार संघ- पुरुष मतदार १,४०,७८५, स्त्री मतदार १,२६,१८९, इतर मतदार निरंक, असे एकूण मतदार २,६६,९७४, मतदान केलेले मतदार पुरुष ९७,१७८, स्त्री ८१,७१६, इतर निरंक, एकूण मतदार- १,७८,८९४, मतदानाची टक्केवारी पुरुष ६९.०३, स्त्री ६४.७६, इतर निरंक अशी एकूण ६१.४० टक्के मतदान.